आमदार वैभव नाईक यांचे मतदारसंघातील भवितव्य अधांतरी!

कणकवली मतदार संघातील ठाकरे सेनेच्या आरोग्य शिबिरांना शासकीय आरोग्य यंत्रणेचा वापर
शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची जोरदार टीका
आमदार वैभव नाईक यांनी शासकिय आरोग्य यंत्रणे बाबत केलेले आरोप हे संपूर्ण बिनबुडाचे आहेत. आम. वैभव नाईक यांच्या पक्षामार्फत म्हणजे उ.बा.ठा. ( शिल्लक सेना ) मार्फत कणकवली विधानसभा मतदार संघात घेतलेल्या आरोग्य शिबिरांना सर्व आरोग्य यंत्रणा हि शासकिय होती. या आरोग्य शिबिरांची सर्व जबाबदारी हि शासकिय आरोग्य यंत्रणांनी घेतली होती. आणि आता याच आरोग्य यंत्रणेवर आम. वैभव नाईक यांनी टीका करणे आणि तेही विधानसभेमध्ये हे निश्चितच हास्यास्पद आहे. आम. वैभव नाईक यांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या जबाबदारीचे व नियोजनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये, हिम्मत असल्यास स्व: खर्चाने जनतेसाठी आरोग्य शिबिरे राबवावीत. असे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे व प्रसिद्धी मिळविणे हे आम. वैभव नाईक यांचे नित्याचे काम आहे. विकासात्मक चर्चा करण्यासाठी आम. वैभव नाईक यांच्या जवळ कोणताही मुद्दा नसल्याने तसेच स्वतः च्या मतदार संघातील त्यांचे भवितव्य अधांतरी झाल्याने आम. वैभव नाईक यांची बडबड सुरु आहे. अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे
कणकवली प्रतिनिधी