पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान आरोग्य पथकात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. कुबेर मिठारी यांचा गौरव
सीईओ प्रजित नायर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी दिले प्रशस्तीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या दौऱ्या दरम्यान नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सेवेकरीता नियुक्त केलेल्या पथकामध्ये मालवण चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी या पथकामध्ये चांगले काम केल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या आरोग्य पथकामध्ये जनतेला चांगली सेवा दिल्याबद्दल डॉ. मिठारी यांचा गौरव करण्यात आला. डॉ. मिठारी हे यापूर्वी कणकवली तालुक्यातील कळसुली आरोग्य केंद्रामध्ये देखील आरोग्य अधिकारी कार्यरत होते. तसेच अनेक वर्ष त्यांनी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या या गौरव बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली