कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी पैठणी स्पर्धेचे आयोजन; रात्री होणार डबलबारीच्या जंगी सामना..

कणकवली : कणकवली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सव २०२३ निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे.त्या निमत्ताने वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर रात्री ९ वाजता डबलबारीच्या जंगी सामना होणार आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन,सकाळी ११ वा.जिल्हास्तरीय, वक्तृत्व स्पर्धा
गट क्र. १ (इ.५वी) ४ ते ५ मिनिटे- शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग,गट क्र. २ ( इ.६ वी ते ८ वी) ५ते ६ मिनिटे – राजमाता जिजाबाईचे स्वराज्यासाठीचे योगदान किंवा छत्रपती शंभूराजे,गट क्र.३ (९ वी ते १२ वी) ६ते ७ मिनिटे -छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी आणि शेतीविषयक धोरण किंवा शिवराज्याभिषेक. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांनी नाव नोंदणी १७ फेब्रुवारी २०१३ पर्यंत करावी.

तसेच सकाळी ११.३० ते १ वाजता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा,गट-अ (इ.५ वी)विषय- सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज ,गट-अ (इ. ६ वी ते ८ वी)चित्रकला स्पर्धा नाव नोंदणी श्री. संतोष देसाई – ९४०५३२८२४२,श्री. सचिन सावंत ९०२१८५८५९७,श्री संतोष राणे ९८८११०४८०४,श्री. हेमंत राणे- ९४०४१६९९८४ या स्पर्धेचे प्रायोजक कणकवली तालुका मराठा समाज शिक्षक संघटना आहे.

दुपारी ३ वा. : हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला आहे.खास महिलांसाठी सायं. ४ ते ६ वा. पैठणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज प्रतिष्ठान, कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

रात्री ९ वाजता कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकूळ बुद्रुक बुवा – सुजित परब
(गुरुवर्य – उदय राणे बुवा यांचे शिष्य)बुवा,पखवाज – हर्षद राणे,
तबला – हर्षद मेस्त्री विरुद्ध श्री सिध्दीविनायक प्रासादिक भजन मंडळ,देवगड, मोंड नाडण बुवा श्री. राजेंद्र रा. मोडे(गुरुवर्य श्री. अजितजी मुळम यांचे शिष्य)
पखवाज वादक संतोष पुजारे,
तबला रोहित तांबे यांच्यात डबलबारीच्या जंगी सामना होणार आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!