कलमठ अंगण रांगोळी स्पर्धेतअंकिता चिंदरकर प्रथम

संदिप मेस्त्री मित्रमंडळाचे आयोजन.

दीपावली निमित्त संदिप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अंगण रांगोळी स्पर्धेत प्रथम अंकिता चिंदरकर ,द्वितीय वैदेही गुरव, तृतीय क्रमांक आरती वायंगणकर, उत्तेजनार्थ किमया हिंदळेकर व दीक्षा नांदगावकर यांनी क्रमांक प्राप्त केला. दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या अंगण रांगोळी स्पर्धेत ४१ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला प्रथम आलेल्या ५ स्पर्धकांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, गुरू वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मेस्त्री,नितीन पवार, स्वाती नारकर, आबा कोरगावकर, बाबू नारकर, समीर ठाकूर, स्वरूप कोरगावकर, समीर कवठनकर,प्रवीण सावंत, मिलिंद चिंदरकर, नाना गोठणकर उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण प्रवीण चिंदरकर केले

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!