सांगवे आंबेडकरनगर येथील भाजपा कार्यकर्ते ठाकरे गटात

शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांची माहिती
सांगवे आंबेडकर नगर येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना ऊ बा ठा पक्षात प्रवेश केला.
सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याची माहिती तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी दिली.
सांगवे आंबेडकर नगर येथील संतोष कांबळे , महेश कांबळे , दिनकर कांबळे , महेंद्र चव्हान , या सह अनेकांनी श्री कुणाल सावंत, सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख मा. सतीश सावंत , तालुका प्रमुख मा. प्रथमेश सावंत , युवासेना तालुका प्रमुख मा. उत्तम लोके यांच्या नेतृत्वाखाली मा. सतीश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख आनंद आचरेकर , युवासेना उपजिल्हप्रमुख मुकेश सावंत, आर एच सावंत सर, दिनेश वाळके, गणेश शिवडावकर, संजय सावंत, अरविंद सावंत, सचिन सावंत, सुदर्शन रासम, राजू टाकेकर, संदेश गुरव, निलेश सावंत, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





