घोडावत विद्यापीठाचे प्रा.प्रीतम निकम यांना पीएचडी प्रदान

जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रीतम बाबुराव निकम यांना मिझोरम केंद्रीय विद्यापीठाकडून पीएचडी-डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ हायब्रीड कॉन्फिग्रेबल मायक्रोस्ट्रीप अँटेनाज्’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.जो 5G तंत्रज्ञानासाठी उपयुक्त आहे. संशोधन काळात एक स्कोपस,दोन SCI प्रकाशित केले.तसेच तीन राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर सादर केले. यासाठी प्रमुख संशोधक गाईड म्हणून डॉ.अजिंता बैद्य, सहाय्यक मार्गदर्शक म्हणून डॉ.जयेंद्र कुमार व्ही.आय.टी विजयवाडा,आंध्र प्रदेश यांनी मार्गदर्शन केले. संशोधन काळात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

error: Content is protected !!