खारेपाटण गट विकास सोसायटीच्या वतीने वाहन तारण कर्ज वितरणचा लाभ

२ शेती ट्रॅक्टर व १ दुचाकी वाहन केले वितरीत

खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर संस्थेच्या ३ शेतकरी सभासदांना वाहन तारण वितरण कर्ज सुविधेचा लाभ देत २ शेती ट्रॅक्टर व १ दुचाकी अशा एकूण ३ वाहणाचे वितरण संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री सुरेंद्र कोरगावकर, संचालक,विजय देसाई,इस्माईल मुकादम,एकनाथ कोकाटे,श्रीधर गुरव,सौ.तृप्ती माळवदे,सौ उज्ज्वला चीके,मंगेश गुरव,रवींद्र शेट्ये,संदेश धुमाळे तसेच संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण सोसायटीच्या वतीने शेतकरी सभासदांना पारंपरिक शेती नवीन यांत्रिकी साधनाचा वापर करून करण्याच्या उद्देशाने शेतीकरिता वाहन तारण कर्ज वितरत केली जातात. चालू वर्षी संस्थेच्या खारेपाटण टाकेवाडी येथील सभासद श्रीम. पार्वती अनंत पाटील यांना मॅसी फर्ग्युसन कंपनीचा सुमारे ६ लाख ५७ हजार रुपये किमतीचा शेती ट्रॅक्टर देण्यात आला आहे.तसेच संस्थेच्या शिडवणे या गावातील सभासद श्रीम.विद्यादेवी हनुमंत लवंगारे यांना देखील व्ही.एस.टी. कंपनीचा सुमारे ४ लाख २३ हजार रुपये किमतीचा शेती ट्रॅक्टर देण्यात आला आहे.तर संस्थेचे सभासद व संचालक श्री विजय देसाई यांना सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीची स्मार्ट ॲक्टिवा कंपनीची टू व्हीलर गाडी देखील यावेळी वितरीत करण्यात आली.
सदर तिन्ही वाहने संस्थेच्या वाहन तारण कर्ज विभागाच्य वतीने संस्थेच्या कार्यालयात या सभासदाना वाहनाच्या चावी प्रदान करत वितरीत करण्यात आली.यावेळी किशोर माळवदे,अनंत पाटील,हनुमंत लवंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!