ऑटो रिक्षा चालक-मालक रेल्वे स्टेशन कणकवली यांना सलग तिसऱ्या वर्षी मीळाला तब्ब्ल पाच हजार दिवाळी बोनस.

रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत यांचा अभिनव उपक्रम.
कणकवली/मयुर ठाकूर
ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेचा बुलंद आवाज सन्मां.संतोष सावंत यांच्या अल्पबचत या अनोख्या संकल्पनेतून हा बोनस रिक्षा चालकांना मिळतोय त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
तब्बल प्रत्येक रिक्षा चालक मालकाला प्रत्येकी पाच पाच हजार रुपये हा दिवाळी बोनस देण्यात आला.
अल्पबचत या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास तब्बल 40 रिक्षा चालक मालकांना दिला हा दिवाळी बोनस आज वितरित करण्यात आला.थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे संतोष सावंत यांनी सुरू केला होता हा उपक्रम. आज आर्थिक मंदी असताना या उपक्रमामुळे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हा बोनस रिक्षा चालकांना मालकांना मिळतोय त्यामुळे रिक्षा चालक मालकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहॆ.
या दीपावली बोनसच वाटप सन्मा.संतोष सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रेल्वे स्टेशनला वाटप पार पडलं.यावेळी रिक्षा चालक-मालकांनी सन्मा.संतोष सावंत यांचे आभार मानले
सावंत साहेब आपल्या या अनोख्या संकल्पनेतून हा रिक्षा चालक मालक गेले कित्येक वर्ष हा दीपावलीचा बोनस घेत दीपावलीच्या अगोदर घरामध्ये दीपावलीची पुर्ण तयारी करु शकतो म्हणून रिक्षा चालक मालकांनी भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना सन्मा. संतोष सावंत यांनी माझ्या तमाम रिक्षा चालक मालकांना ही दीपावली सुख समृद्धी नीरोगी आरोग्याची आणी उदंड आयुष्याची जावो अशी प्रार्थना कणकवली चे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ आणि परमहंस भालचंद्र बाबांच्या चरणी केली.