जिल्हाधिकारी किशोरा तावडे यांची प्रकृती बिघडली

सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय व नंतर मणिपाल रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. सोमवारी कामावर हजर झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्स वर सहभागी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले व लागलीस त्यांना हलविण्यात आले आहे. हृदयविकाराचा त्रास त्यांना जाणू लागल्याचे जिल्हा रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोमवारी दुपारी मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. संजीव आकेरकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका सुरू ठेवला होता. उशिरापर्यंत थांबून त्याने रेंगाळलेली अनेक कामे मार्गी लावली होती. प्रशासनातील कामाचा ताणही त्यांच्यावर मोठा होता. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. व लागलेस त्यांना रुग्नेसेवेसाठी दाखल करावे लागले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग

error: Content is protected !!