आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “आयडियल स्टडी ॲप” चे अनावरण.
कणकवली/मयुर ठाकूर.
विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विविध प्रकारच्या नवनवीन वेगवेगळ्या विषयातील समस्यांवर मात करत प्रत्येक विषय सोपा व सहज करून देऊन विद्यार्थ्यांमध्ये यशाच्या शिखरावर नेणारे असे “आयडियल स्टडी ॲप” चे अनावरण रोटरी क्लब ऑफ ऐरोली नवी मुंबई आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे येथे करण्यात आले.विद्यार्थ्यांना या ॲप बद्दल माहिती व ॲप चे फायदे रोटरी क्लब ऑफ लिंक टाऊन ऐरोलीचे प्रेसिडेंट रोटरियन अनिल लाड यांनी दिली, तसेच झोनल कोऑर्डिनेटर रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट यांनी विद्यार्थ्यांना या ॲप बद्दल मार्गदर्शन केले.सर्व मान्यवरांना आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने सन्मानित करण्यात आलं.यानिमित्ताने व्यासपीठावर झोनल कोऑर्डिनेटर रोटरी डिस्ट्रिक्ट प्रणव तेली,असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट राजन बोभाटे,असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट दिवाकर दळवी,प्रेसिडेंट रोटरी क्लब कणकवली सेंट्रल शंकर उर्फ रवी परब,प्रेसिडेंट लिंक टाऊन रोटरी क्लब ऐरोली नवी मुंबई अनिल लाड, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मेडिकल कॅम्पस डॉक्टर विद्याधर टायशेटे,माजी सेक्रेटरी रोटरी क्लब कणकवली उमा परब,रोटेरियन TRF चेऊर रोटरी फ्लाऊंडेशन ऐरोली डॉक्टर बाळू उपाध्ये,क्लब सेक्रेटरी लिंक टाऊन ऐरोली मुरलीधर नायर,रोटेरियन मेघा गांगण,रोटेरियन श्री बेहरामजी राठोड,ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सल्लागार डी.पी तानवडे सर,मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.