कणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मधील प्रकार

पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध सुरू

कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्याच्या बॅगेतील तब्बल ५६ हजार ४१० रुपयांची रक्कम एका महिलेने हातचलाखी करत लंपास केल्याचा प्रकार आज मंगळवारी दुपारच्या दरम्यान उघडकीस आला. दोन महिलांनी मिळून हा प्रकार केला असून, बँकेत भर गर्दीत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या दोन संशयित महिलांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नगरपंचायत कर्मचारी संजय राणे कर रुपात वसूल केलेले रक्कम बँकेत जमा करत असतानाच धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत लेखापाल प्रियांका सोंसुरकर, मनोज धुमाळे, किशोर धुमाळे, रुजुता ताम्हणनेकर आदींनी या बँकेत धाव घेतली. तसेच पोलीस कर्मचारी विनोद सुपल हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची कणकवली पोलिसात तक्रार नोंदविण्याची काम सुरू आहे.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!