कणकवली बेळणे खुर्द मध्ये भाजपाला धक्का देत ठाकरे गटाचे सरपंच विजयी

बेळणे खुर्द सरपंच पदी अविनाश गिरकर यांची मोठ्या फरकाने निवड

कणकवली तालुक्यामधील भाजपचा विजयाचा वारू बेळणे मध्ये रोखला

कणकवली तालुक्यामध्ये बेळणे खुर्द या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाला धक्का देत शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश गिरकर हे 26 च्या मताधिक्य ने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार विलास करंडे यांना अवघी 26 तर भाजपाचे लक्ष्मण चाळके यांना 192 मते मिळाली. तर विजयी उमेदवार अविनाश गिरकर यांना २१८ मते मिळाली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजेंद्र चाळके यांना ९० तर उदय चाळके यांना 83 मते मिळाली. तर प्रभाग तीन मध्ये विलास करांडे यांना 10 तर सिद्धार्थ तांबे यांना 65 मते मिळाली. यापूर्वी प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंच शिवसेना गटाचे तर बाकी सर्व सदस्य हे भाजपाचे विजय झाले आहेत.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!