युवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन
विविध स्पर्धांमध्ये २२४ विद्यार्थ्यांचा सहभाग
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे उद्घाटन जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आज करण्यात आले. यावेळी अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान, अध्यक्ष कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय,चे संदेश उर्फ गोट्या सावंत, मोहन सावंत, सुरेश सावंत, विजय भोगटे, मंगेश बोभाटे, विनय सावंत पत्रकार, अशोक कांबळे, मिलिंद बोभाटे, रायमन डिसोझा, केंद्रप्रमख उत्तम सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी उपक्रमांचे कौतुक केले.स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत 224 विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ९.३० वा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे होणार आहे. यावेळी कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालयाचे २५ वर्षे यशस्वीपणे सचिव पद संभाळ्याबद्दल नाना काणेकर यांचा मान्यवरांचा हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली