रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल,आणि ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड.

कणकवली/मयुर ठाकूर.
आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे आणि या पर्यावरण संवर्धनाची महत्त्वपूर्ण कास म्हणजे ज्यामुळे आपण चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन घेऊ शकतो याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यानिमित्ताने वृक्ष मित्र व शेती या विषयात पीएचडी केलेले तज्ञ श्री गजेंद्र कृपाळ यांच्या वतीने शाळेसाठी 50 झाडे देण्यात आली ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते श्री कृपाळ यांचा शाल व श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रोटरी अध्यक्ष श्री शंकर परब यांनीही कृपाळ सरांना सन्मानित केले उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमासाठी शेतीतज्ञ श्री राजेंद्र कृपाळ सर,रोटरी क्लब अध्यक्ष श्री शंकर परब रोटरीएन उमा परब मॅडम ,श्री विजापूर ,श्री बेहराम राठोड ,आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई उपस्थित होते