जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांची बाजी.

कणकवली/मयुर ठाकूर.

विद्या मंदिर हायस्कूल कणकवली येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय स्पर्धा तायक्वांदो खेळात ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे 14 वर्षाखालील मुलींच्या गटात स्कूलची *कुमारी *दीपश्री दीपक तेंडुलकर हिने* जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन परब आणि गणराज शिरवलकर यांनी वेगवेगळ्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला तीनही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष बुलंद पटेल ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर ,सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. तानावडे सर,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे .

error: Content is protected !!