अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत तळवडेतील शेतकरी यास देण्यात आले कर्ज

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते बोलेरो गाडीची चावी आली देण्यात

सावंतवाडी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत तळवडे गावातील शेतकरी शामसुंदर परब यांना गाडीसाठी कर्ज देण्यात आले .

यावेळी बोलेरो गाडीची चावी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक श्यामसुंदर पोकळे, शिवप्रसाद परब , कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी अग्रेसर ठरली आहे. तळवडे शाखेमार्फत शेतकऱ्यांच्या समस्या व सर्वांगीण विकासासाठी व उद्योग व्यवसायासाठी सिंधुदूर्ग जिल्हा बँक तळवडे शाखेमार्फत नेहमी सहकार्य केले जाते ,सिंधुदुर्ग जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या सदैव आर्थिक कर्ज पुरवठा करत आहे .सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी व उद्योग व्यवसायासाठी हि बँक सदैव आर्थिक सहकार्य करत आहे.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!