भाजपाचे माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

ठाकरे सेनेकडून सरपंच पदाची उमेदवारी मंगेश टेमकर यांना जाहीर

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. रविवारी भाजपा पक्षाचे, माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहित ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक व जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. यावेळी मंगेश टेमकर यांना होऊ घातलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ठाकरे सेनेच्या सरपंच पदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पक्षप्रवेश करतेवेळी मंगेश टेमकर म्हणाले की आपली मुलगी भाजप पक्षाचा सरपंच असतानाही माजी खासदार निलेश राणे व दत्ता सामंत यांना सांगितलेली एकही विकासकाम केले नाही उलट जाणीवपूर्वक आपणास डावलले जात होते. मात्र वैभव नाईक हे त्यावेळी विरोधक असूनही आमची विकास कामे मार्गी लावत होते म्हणूनच आपण ठाकरे सेनेत प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शिल्पा खोत, शंकर मिराशी, मंदार केणी, उदय दुखंडे, नारायण कुबल समीर हडकर, नितीन वाळके, विनायक परब,शाम घाडी अनुष्का गावकर, भाई कासवकर चंदन पांगे मंदार ओरसकर, दिलीप कावले उपस्थित होते.

आचरा, प्रतिनिधी

error: Content is protected !!