वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन

कणकवली वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात १५ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघातर्फे करण्यात आले आहे.
रविवार १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजता घटस्थापना, श्री देवीची महापूजा, चंडीपाठ, कुमारी पूजन असा कार्यक्रम होणार आहे.
घटस्थापनेपासून २३ ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ३.३० वा. पुराण वाचन – श्री पु.वि. काजरेकर (जांभवडे), सायंकाळी ३.४५ ते ५.१५ ह.भ.प. श्री. अवधूत धूपकर (पिंगुळी) यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७.३० ते ८.३० वा पालखी प्रदक्षिणा, आरती, मंत्रपुष्प असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत पुढील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवार १५ ऑक्टोबर- नादब्रम्ह सावंतवाडी प्रस्तुत नाट्यभक्तीधारा गायन मैफील, मंगळवार १७ ऑक्टोबर- श्री.मुकुंदराव क्षीरसागर (जोधपूर) यांचे गायन, शुक्रवार २० ऑक्टोबर- रात्री ८.३० वाजता अष्टावधान सेवा, रविवार २२ ऑक्टोबर श्री सदगुरू संगीत विद्यालय सावंतवाडी प्रस्तुत भ्कतीनाट्यधारा गायन मैफील, सोमवार २३ ऑक्टोबर सकाळी नवरात्रोत्थापन, मंगळवार २४ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त सायंकाळी ४ ते ५ लळीताचे कीर्तन, सायंकाळी ५.३० वाजता साेने लुटणे असे कार्यक्रम होणार आहेत.
रविवार २२ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसाद दिला जाणार आहे.
कणकवली प्रतिनिधी