सानिका जाधवचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी
निलेश जोशी । कुडाळ : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र’ तर्फे महाराष्ट्राचा दमदार वक्ता या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपीच्या महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सानिका दत्ताराम जाधव हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी विश्वगुरू भारत, महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील खरा पैलवान, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी राजकीय स्थिरता, शेतकऱ्यांच्या हितासाठी जलनीती, व्हिजन महाराष्ट्राच्या विकासाचे असे विविध विषय होते. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये “विश्वगुरू भारत” या विषयावर सानिका जाधव हिने प्रभावी भाषण करत तृतिय क्रमांकासाठी ठेवलेले रोख रुपये ५ हजारचे पारितोषिक प्राप्त केले .यातील यशस्वी स्पर्धकांची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सानिका जाधव ही मूळ फोंडाघाट हवेली नगर येथे राहणारी असून, शालेय स्तरापासून तिने विविध वक्तृत्व व निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत नेत्रदीपक यश संपादन केलेले होते .
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये बॅ.नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, फिजिओथेरपीचे प्राचार्य सौरभ धर, डॉ प्रगती शेटकर , डॉ.शरावती शेट्टी व तिच्या प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते .तिच्या या यशाबद्दल संस्थाचालक चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी डॉ .व्यंकटेश भंडारी इत्यादींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल बद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.