शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सिंधुदर्ग जिल्हयातील पत्रकारांची सिधुदुर्गनगरीत निषेधार्थ काळ्या फिती लावून निदर्शने

जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेधार्थ जिव्ह्यातील पत्रकारानी काळ्या फिती लावून सिधुदुर्गनगरी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्श ने करत निवासीजिल्हाधिकारी सोनाने यांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघटनानी काळया फिती लावून काम केले, आणि नंतर निवाशी उपजिल्हाधिकारी सोनाने यांना निवेदन दिले यानिमित्तानं पुन्हा एकदा जिल्हयातील पत्रकार एकत्र येत आपलयामधील एकजुटीचं दर्शन घडविले.मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणारया हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला होता त्यानुसार जिल्हयातील तालुका पत्रकार संघटनांशी चर्चा करून या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर ,सचिव देवयानी वरस्कर, परिषद सदश्य गणेश जेठे , नदकिशोर महाजन ,गजानन नाईक, वसंत केसरकर, संतोष वायंगणकर, अभिमन्यू लोढे ,महेश सरनाईक, बाळ खडपकर, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार, रविद्र गावडे,मुख्यालय अध्यक्ष संजय वालावलकर व जिल्हयातील पत्रकार तसेच तालुका संघटना अध्यक्ष पदाधीकारी सहभागी झाले होते यावेळी घडलेल्या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविला यावेळी जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणा ऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी जिल्हाभरातील पत्रकारानी काळ्या फिती लावून काम केले वारीशे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे मात्र तो अपघात नसुन घातपात आहे हे उघड होत आहे व गाडीने ठोकर देत दुदैवीमृत्यू हा योगायोग्र नसून कटरचुन केलेला खुनच असल्याने याघटनेचा आम्ही जिल्हयातील पत्रकार तिव शब्दात निषेध नोदवितो आणि तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली दरम्यान जिल्हा मुख्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी सोनाने यांना जिल्हा मुख्यालय समितीनेही निवेदन दिले यावेळी मुख्यालयपत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकर, बाळखडपकर, संदीप गावडे, विनांद दळवी, मनोज वारंग, नंदकुमार आयरे आदी उपस्थीत होते, निवंदन
हा विषय सर्व पत्रकार आणि संघटनांसाठी जिव्हाळ्याचा असल्याने स्थानिक पातळीवरील सर्व मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी या आंदोलनात सहभागी झाले होते..

प्रतिनिधी/ कोकण नाऊ / सिंधुदुर्ग

error: Content is protected !!