स्ट्रीट लाईटचे बल्ब साकेडी ग्रा. पं. च्या माध्यमातून बसविले

सरपंच सुरेश साटम यांचा पुढाकार
स्वतःच्या डोक्याच्या भाराने विकास कामे मार्गी लावावीत
सरपंच सुरेश साटम यांचा टोला
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकेडी फौजदारवाडी, तांबळवाडी ते बौद्धवाडीपर्यंत च्या स्ट्रीट लाईटचे बल्ब साकेडी ग्रा. पं. च्या माध्यमातून बसविण्यात आले आहेत. सदर स्ट्रीट लाईट ग्रा. पं. च्या अंतर्गत येत नसली तरी ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन सरपंच सुरेश साटम यांनी पुढाकार घेत स्ट्रीट लाईटचे बल्ब लावून घेतले आहेत.
यामुळे साकेडी तांबळवाडी ते राजू राणे घरापर्यंतचा रस्त्याचा परिसर गणेश चतुर्थीच्या कालावधीत उजळून निघणार आहे. त्यामुळे फक्त दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असा टोला सरपंच सुरेश साटम प्रसिद्धी पत्रकाद्वारे विरोधकांना लगावला आहे. या कामाचा ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून बल्व घेऊन फोटो काढून कामे होत नसतात. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा महत्वाचा असतो. परंतु काही लोक स्वत: चे डोके न वापरता दुसऱ्यांच्या डोक्याने नेहमी राजकरण करतात. त्यांनी गावच्या विकासकामे करण्यात भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
कणकवली प्रतिनिधी