शिवसेनेच्या वतीने खारेपाटण चेकपोस्ट येथे चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था

युवा सेना जिल्हाप्रमुख सूकांत वरुणकर यांचा उपक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच खारेपाटण चेक पोस्ट येथे सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना युवा सेना प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या सौजन्याने व शिवसेना शिंदे गट पुरस्कृत मुंबई वरून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तासाठी उभारण्यात आलेल्या मोफत चहापान स्वागत कक्षाचे उद्घघाटन आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे व कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूनकर, कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव,खजिनदार भास्कर राणे, श्री लियाकत काझी,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे,सौ अस्ताली पवार,श्री मंगेश ब्रम्हदंडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत,केळवली शिवसेना विभाग प्रमुख श्री तनावडे,श्री परवेज पटेल,शमशुद्दिन काझी,पोलीस कॉन्स्टेबल मारुती बराड,पराग मोहिते,ट्रॅफिक पोलीस प्रशांत धुमाळे,अमोल काळे तसेच शिवसेना कार्यकर्ते सौ नंदिनी पराडकर,देवानंद ईसवलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे कोकणात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे श्री संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मुबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांना सुरक्षित घेऊन येणाऱ्या एस टी चालक वाहक यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खाजगी वाहने तसेच एस टी बसने व रेल्वेने येणाऱ्या गणेश भक्तांना खारेपाटण येथे शिवसेना पक्षाच्या वतीने मोफत चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे गणेश भक्तांच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा प्रमुख संजय आंग्रे कणकवली पोलीस निरीक्षक शरद देठे यांचा युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरूनकर यांच्या शूभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण