पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची आश्वासने हवेत!

रेल्वेस्टेशन वरील प्रवासी निवारा छप्पर पूर्ण नाही

विमानतळा बाबत देखील बोंबाबोंब

मागील 15 वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला सातत्याने फसवले आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे , अनधिकृत विमान उडवून माजी पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनीही स्वतः श्रेय घेण्यासाठी चढाओढ केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही गणेशोत्सवात चिपी वरून नियमित विमानसेवा सुरू राहील हे फसवे आश्वासन दिले.सध्या पालकमंत्री चव्हाण असो किंवा खासदार विनायक राऊत कींवा स्थानिक आमदार असो, ह्या सर्वांनी जनतेची फसवणूक केली.पालकमंत्र्यांनी गणेशोत्सव पूर्वी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म वर आच्छादन घालण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे.गणेशचतुर्थीला रेल्वेने येणारे गणेशभक्त चाकरमानी पावसात भिजत गावी पोचणार आहेत. रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी निधी मिळत नाही.नॅशनल हायवे ची एक लिंक जरी चालू केली असली तरी अन्य रस्तेमार्ग खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभाग प्रशासन आणी सत्ताधाऱ्यांची उदासीनता आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात डॉक्टर नाहीत , गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाहीत याकडे पाहत नाहीत. पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री हे निष्क्रिय ठरल्याचा आरोप श्री उपरकर यांनी केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!