रिक्षा भाडे नाकारल्यास “या” नंबर वर करा तक्रार

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवाहन

गणेशोत्सव कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असताना या कालावधीत रिक्षा व्यवसायिकांकडून जादा भाडे आकारणी किंवा भाडे नाकारले तर याबाबत तक्रार असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून नंबर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार 98 22 84 23 33 व 98 19 27 02 09 तसेच दिलेल्या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खाजगी कंत्राटी वाहनांचे कमाल भाडे दर खाजगी वाहनांचे कमाल भाडेदर हे परिवहन महामंडळाच्या भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. असे नियमबाह्य दर किंवा भाडे केल्यास संबंधित क्रमांक व ईमेलवर तक्रार करावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!