भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्तीपत्र

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये निमंत्रित सदस्य म्हणून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे ही गेली अनेक वर्ष राजकारणात असून, काँग्रेस मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची वाटचाल सुरू केली. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढता असून नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय असे आहे. जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपले नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!