तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत वेदांत वायंगणकर द्वितीय ,मृदुला गोडे चतुर्थ क्रमांक
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील ११ वी सायन्सचा खेळाडू वेदांत वायंगणकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर उपविजेते पद पटकावले. तर १९ वर्षे वयोगटात मुलींमध्ये मृदुला गोडे-(१२ वी वाणिज्य) हिने चतुर्थ
क्रमांक प्राप्त केला आहे.तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा कनेडी येथे पार पडली
या यशस्वी खेळाडूंची कनेडी येथे १३ व १४ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा. विनायक पाताडे, अवधूत कानकेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभाग इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम.डी. खाडये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर व ज्येष्ठ शिक्षिका सौ. बी. बी. बिसुरे यांनी अभिनंदन केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण