मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

रस्ता बनला होता डोकेदुखी;पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची मागणी

पावसाळ्यात वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनलेल्या मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम आजपासून (ता.१२) सुरु झाले आहे.जवळपास एक किलोमीटरचा रस्ता खड्डे पडल्याने धोकादायक बनला होता.
दोडामार्ग बांदा मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते कलमठाणा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती.त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत होती.दोडामार्ग बांदा रस्त्याचे सुमारे २२ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले ;पण एक किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे.एका गॅस कंपनीने गॅस पाइपलाइन नेण्यासाठी रस्त्याची बाजूपट्टी खोदली पण त्याचे मजबुतीकरण अथवा डांबरीकरण केले नाहीं त्यामुळे तो भाग खचला आणि धोकादायक बनला होता.त्या रस्त्यावरून वाहने हाकणे धोकादायक होते.त्यासाठी अनेकांनी आंदोलनाचे इशारे दिल्यावर गॅस कंपनीच्या खोदाईमुळे पडलेले खड्डे बांधकामे तात्पुरते भरून घेतले; मात्र रस्त्यातील खड्डे तसेच होते.ते भरण्याचे काम आजपासून सुरू झाले.पावसाळा संपताच त्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.

दोडामार्ग l प्रतिनिधी

error: Content is protected !!