शिक्षक भारतीच्या वतीने श्री. संतोष वैज यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व सदिच्छा प्रदान कार्यक्रम.

सावंतवाडी /मयुर ठाकूर.
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व सावंतवाडी शाखा यांच्या वतीने “शिक्षक दिनाचे” औचित्य साधून कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीचे सेवानिवृत्त शिक्षक, व शिक्षक भारतीचे सहसंघटक श्री.संतोष वैज यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते.
यावेळी विचार मंचावर शिक्षक भारती सिंधुदुर्ग व माध्यमिक पतपेढी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर सर, राज्य प्रतिनिधी सी. डी. चव्हाण सर, सचिव- श्री. समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण, तालुका अध्यक्ष अनिता सडवेलकर, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर सर, पतपेढी उपाध्यक्ष सुमेधा नाईक, पतपेढी संचालक श्री.प्रदीप सावंत, दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जयवंत पाटील, सोनुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. गोविंद मोर्ये, विध्यासेवक पतपेढी अध्यक्ष श्री. पवन वणवे, सर्वशिक्षाच्या विषय तज्ज्ञ सौ. सरिता गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी केले. यावेळी हनुमंत नाईक, पांडुरंग काकतकर, सुस्मिता चव्हाण, पालयेकर सर, प्रदीप सावंत, दिगंबर सारंग, विद्यानंद पिळणकर, विजय ठाकर, गावडे मॅडम इत्यादी शिक्षक मित्रांनी सरांच्या जीवनातील हृदय आठवणी कथन केल्या व सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून सांगितले.सरांची स्वयंशिस्त आणि विद्यार्थी प्रियता याबाबत आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर श्री. संतोष वैज व सौ.स्नेहप्रभा वैज यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री. वेतुरेकर सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संतोष वैज यांचे चिरंजीव श्री. अभिनव वैज यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक भारती तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सावंतवाडी शिक्षक भारती तर्फे वैज सर यांना शिक्षक मित्रांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. यावेळी आजगाव मुख्याध्यापक व स्टाफ यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. तसेच सोनूर्ली हायस्कूलच्या वतीने सरांचा सत्कार करण्यात आला. सर्वशिक्षा सावंतवाडीच्या वतीने सरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, अन्य मान्यवरांनीही यावेळी सदिच्छा दिल्या. यानंतर श्री. सी. डी.चव्हाण, प्रशांत आडेलकर, सुमेधा नाईक, मानकर सर , तिवरेकर सर यांनी सरांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती संतोष वैज यांनी आपल्या मनोगतात यापुढेही शिक्षक भारतीचे काम असेच पुढे चालू ठेवणार असे सांगून शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या सर्व शिलेदारांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर यांनी मनोगत व सदिच्छा देऊन सरांविषयी संघटनेच्या कार्यात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शेवटी आभारप्रदर्शन तालुका सचिव अरविंद मेस्त्री यांनी केले व सहभोजनाने समारंभाची सांगता करण्यात आली.