मुसलोंडी ग्रामविकास मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी पालक मेळावा व गुणगौरव सोहळ्यात श्री. सत्यवान यशवंत रेडकर सरांचे निशुल्क मार्गदर्शन

विरार : गुहागर (रत्नागिरी) तालुक्यातील मौजे मुसलोंडी ग्रामविकास मंडळातर्फे गावातील उत्तीर्ण २२-२३ सालामध्ये दहावी / बारावी /पदवीधर/विशेष प्राविण्य विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा भाऊ साहेब वर्तक सांस्कृतिक सभागृह, विरार (पश्चिम) येथे नुकताच संपन्न. विद्या, संगीत, कलेची देवता सरस्वती पूजन व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमास प्रारंभ. सांस्कृतिक गीत कु नूतन दि. बारगोडे, कु श्रवण दि. बारगोडे, कु शर्वरी ग. बारगोडे सादर केले.

सदर हे मंडळ गावातील विचारवंतांनी १९६७ साली स्थापन केले, गेली ४१ वर्षे हे मंडळ विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करीत येत आहे.
ह्यावेळेस १७ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे, व्याख्याते, मार्गदर्शक मा. श्री. सत्यवानजी यशवंत रेडकर सर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार,
संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था) लाभले त्यांनी पालक आणि विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान, दहावी, बारावी, पदवीधर नंतर काय करावे अशा अत्यंत बहुमल्य मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. सरांचे २१२ वे व्याख्यान होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शांताराम भि. बारगोडे यांनी अध्यक्षयी भाषणात सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, हा संदेश देवून राष्ट्र गीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदर ह्या सोहळ्यानिमित्त प्रस्तावना, पाहुणे स्वागत, बक्षीस वितरण, सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन हे मंडळाचे सचिव श्री चंद्रकांत भा सोलकर, उपाध्यक्ष श्री अनंत स सोलकर, खजिनदार श्री मिलिंद ज बारगोडे, श्री रमेश स. गराटे यांनी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग भा. बारगोडे, श्री नंदकिशोर का बारगोडे, श्री कृष्णा पां सोलकर, श्री अनिल का बारगोडे, श्री निलेश के सोलकर, श्री गणेश रा. सोलकर, कु अभय ज. बारगोडे, कु. ऋतिक चं सोलकर, श्री धर्मराज रा बारगोडे, श्री उदय ल. गावणग, श्री दिलीप ग बारगोडे विशेष सहकार्य केले असे आयोजक कळवितात.

error: Content is protected !!