हुमरमळा-वालावल यथील श्री रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देणार

आमदार वैभव नाईक, यांचे पालकांना आश्वासन

आमदार वैभव नाईक यांचा गावभेट कार्यक्रम

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देऊन पालकवर्गाची मागणी पुर्ण करणार असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. ,गावभेट कार्यक्रमांतर्गत कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी हुमरमळा वालावल गावाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. हुमरमळा येथील मैथिली अपार्टमेंट श्री देव रामेश्वर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी हुमरमळा देसाईवाडा पुल, बिजोळेवाडी पुल ही दोन कामे मंजूर होती. परंतु नविन आलेल्या सरकारने स्थगिती दीली असल्यामुळे रखडली होती आता कुठल्याही मार्गाने निधी देऊन ही कामे पुर्ण करु तसेच हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदीर शाळेसाठी नविन इमारत देऊन पालकवर्गाची मागणी पुर्ण करणार असे आम नाईक यांनी सांगितले,तसेच खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नविन ग्रामपंचायत इमारत बांधकाम साठी निधी दिला असुन या इमारतीच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही याची ग्वाही आम नाईक यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी पालकवर्गाच्या वतीने सरपंच प्रविण मार्गी, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, शाखाप्रमुख रमेश परब, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई यांनी शाळेच्या निधिसाठी निवेदन दिले,
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सरपंच सौ अर्चना बंगे, युवासेनेचे मितेश वालावलकर, सोनाली मांजरेकर,कांता माड्ये,अमृत देसाई,बाळा परब, धनंजय परकर, तात्या कद्रेकर, भाऊ गुंजकर, रमेश परब, भिवा गुंजकर, मंदार वालावलकर, उमेश कानडे, सत्यवान परकर, सुमित परब, अनंत आकलेकर, शरद वालावलकर, अण्णा कद्रेकर, सुमन वालावलकर, अमित बंगे, नाथा ताम्हणेकर, नामदेव परब, वैभव मांजरेकर, दत्ता गुंजकर,हरी गुंजकर पांडु तुळसकर,व इतर उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!