औंधकर रावसाहेब यांचे निधन!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होता त्यांचा मोठा मित्रपरिवार
कराड येथे गावी झाले अंत्यसंस्कार
मूळ कराड येथील असलेले व कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात औंधकर रावसाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले सेवानिवृत्त अभियंता मधुकर रघुनाथ औंधकर (69) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. औंधकर रावसाहेब यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय सेवेची सुरुवात ही पाटबंधारे अभियंता म्हणून झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवधर प्रकल्प, तिलारी आंरराज्य प्रकल्प यासह अन्य अनेक मोठ्या पाटबंधारे प्रकल्पामध्ये त्यांनी अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ सार्वजनिक बांधकाम, विभागात अभियंता व नंतर मुबंई मध्ये वरळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात त्यांनी अधिकारी म्हणून काम केले. मंत्रालयासह पोलीस, तहसीलदार व अन्य विविध विभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांशी यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. कणकवलीत त्यांचा मोठा मित्र परिवार होता. उत्कृष्ठ नेमबाज, म्हणून ते परिचित होते. बंदुक याविषयी त्यांना विशेष आवड होती. परवाना असलेली दुर्मिळ, मौल्यवान शस्त्र त्यांच्याकडे होती. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





