‘साहित्य समाज घडविते’ संदेश देत खारेपाटण महाविद्यालयात आयोजित केली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

खारेपाटण येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग , हिंदी विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्यावतीने दिनांक २७/०८/२०२३ रोजी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सर्व शाखेतील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटक प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे मराठी विभाप्रमुख ,सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ यांनी साहित्य आणि समाज यांची सांगड घालून मुलांना उत्तम व प्रेरित असे मार्गदर्शन केले.तसेच कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉ.सुरेखा रोंगटे अर्थशास्त्र विभागप्रमुख, फर्ग्युसन महविद्यालय पुणे यांनी मुलांना अर्थशास्त्राचे महत्व सांगून जीवनातील अर्थशास्त्राचे स्थान अधोरेखित केले.त्याच बरोबर दुसरे अतिथी डॉ. संजय मेस्त्री मराठी विभगप्रमुख, आबासाहेब मराठे महाविद्यालय हातिवले यांनी मराठी साहित्याची मैफिल रंगवत मराठी साहित्याचा भांडार मुलांसमोर उघडकीस आणला .
अध्यक्षिय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची असणारी सद्य स्थिती सांगितली. आज जगात प्रथम विश्ववृत्तावर यशस्वीरित्या चंद्रयान सोडण्याचा बहुमान आपल्या देशाला ज्यांच्यामुळे मिळाला त्या शास्त्रज्ञांनी देशासाठी उत्तम कार्य केले . याचे त्यांनी कौतुक केले.यावेळी
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना जिल्हासमन्वयक प्रा. वसीम सय्यद यांनी मानले तर सुत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा.सौ.रश्मी देसाई यांनी केले .

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!