सुनील कर्ले यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटण -तळेरे विभाग यांच्या कडून करण्यात आले अभिनंदन

सुनील कर्ले यांची नडगिवे गावच्या तंटामुक्तीअध्यक्ष पदी निवड

नडगिवे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत सुनील कर्ले यांचीतंटामुक्त समिती अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली.यापूर्वी सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.तसेच ते माजी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदी ,तसेच शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.सामाजिक बांधिलकी असणारे सुनील कर्ले लोकांच्या मदतीला नेहमीच धावून जातात. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या सुनील कर्ले यांची तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड झाल्याने ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने एकनाथ कोकाटे-तळेरे खारेपाटण विभागप्रमुख , विलास करंगुटकर -शाखा प्रमुख खारेपाटण -तळेरे ,यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.तसेच इतर शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ही सुनील कर्ले यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अस्मिता गिडाळे,खारेपाटण

error: Content is protected !!