कुडाळ प.स. आयोजित पाककृती स्पर्धेत अनिता नेरुरकर प्रथम

मेरी मिट्टी मेरा देस  अभियानांतर्गत श्रावणमेळा आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : मेरी मिट्टी मेरा देस  अभियानांतर्गत कुडाळ पंचायत समिती आयोजित ७५० पाककला स्पर्धातून अनिता नेरूरकर यांनी विजेतेपद मिळविले तर समूहनृत्य स्पर्धेमध्ये कुडाळ हायस्कूल इंग्रजी माध्यमने  प्रथम क्रमांक मिळविला
      केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांमधील मेरी मिट्टी मेरा देस  अभियानातील  श्रावणमेळा कार्यक्रमांतर्गत रानभाजी व पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुमारे ७५० प्रकार होते. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय समूहगीत व समूहनृत्य स्पर्धांचे पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा निकाल
सर्वोत्कृष्ट पाककला कृती प्रथम अनिता  नेरूरकर भुईआवळा बडी लाजाळू चटणी पेव्याच्या पानांची चटणी, द्धीतीय प्रिया खानोलकर पेव्याच्या पानाची चकली, तृतीय रसिका  वालावलकर गुळवेल वडी, उतेजनार्थ मनिषा भिमराव हळदिकर भरडधान्य पौष्टिक लाडू व सोजी, वृषाली तोरस्कर भारंगी फुलाची व वरीची बर्फी.
रानभाजी / भरडधान्य पाक कला स्पर्धा अंतिम निकाल गटनिहाय निकाल
प्रथम तेंडोली नेरूर बचत गट वृषाली तोरसकर आंदुर्ले भारंगीच्या फुलांची व वरीची बर्फी , आब्रड ओरोस बचतगट प्रियांका परब, कसाल कुडयाच्या शेगाचे लोणचे, माणगाव बचत गट अनिता हळदणकर, साळगाव भरडधान्य वापरून पेगव्याची वडी, पावशी वेताळबाबर्डे बचतगट प्रतीक्षा परब, बाव मिक्स भरडधान्य भाकरी व अळूचे फदफदे, कडावल अंगणवाडी अपर्णा सावंत नरवेल गुळपोळी, कसाल अंगणवाडी सायली परब भारंगी फुलांची भाजी, सुरण पाने भाजी, वालावल अंगणवाडी कविता गवाणकर टाकळ्याच्या पानाच्या, माणगाव-1अंगणवाडी अनिता राउळ चवईच्या फुलांची भाजी, माणगाव-2 अंगणवाडी पूजा मेस्त्री शेडवेल पानांची भाजी, पणदूर-1अंगणवाडी सदिच्छा  चव्हाण अंगणवाडी टाकळयाचे थालीपीठ, पणदूर – 2 अंगणवाडी प्राजक्ता कासले रानकेळ फुलांची भाजी अळूवडी, हिर्लोक अंगणवाडी छाया शेगले करांद्याची भाजी करादयाचा मुरांबा. आरोग्य विभाग तन्वी गावडे टाकळ्याची भाजी, पराठा, आप्पे, चटणी.


समूहनृत्य स्पर्धा निकाल
या स्पर्धेत प्रथम कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडीयम द्धीतीय न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे, तृतीय ओरोस हायस्कूल यांनी मिळविला.
विजेत्या संघाला गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी यावेळी माजी सभापती जयभारत पालव  सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण  गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर कृषी अधिकारी बाळकृष्ण परब प्रफुल्ल वालावलकर शिक्षक नेते के टी चव्हाण बालविकास प्रकल्पाच्या गीता चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समूहनृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून भूषण तेजम, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, सागर दळवी, समूहगान परीक्षक प्रफुल्ल रेवणकर,  मान्यता कुंटे, गौरव पिंगुळकर, रानभाज्याचे  परीक्षक कल्पना खानोलकर, डॉ उज्वला सावंत, प्रसन्ना कोदे, राजा शृगारे, डॉ चारुलता आचार्य, शुभदा सावंत, तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पंचायत समिती अधिकारी कर्मचारी वर्ग कुडाळ तालुक्यातील समुहगान व समूहनृत्यातील शालेय विद्यार्थी शिक्षक कुडाळ तालुक्यातील सरपंच आजी माजी लोकप्रतिनिधीं आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!