रानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृती ठरल्या लक्षवेधी

पाट हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा
निलेश जोशी । कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय आणि कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि डाॕ.विलासराव देसाई कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय ,पाट. येथे गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी विद्यालयात रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले. यावेळी रानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृती ठरल्या लक्षवेधी ठरल्या.
आजकालच्या फॕशनच्या दुनियेत पिझ्झा बर्गरची वाढती मागणी बघता आपल्या परिसरातील आरोग्यवर्धक रानमेव्याचा विसर हळूहळू सर्वांनाच पडायला लागला आहे. या रानभाज्यांचा परिचय आणि त्याचे महत्त्व आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे.फास्टफूडपेक्षा उत्तम आरोग्यासाठी रानभाज्याही अतिशय उपयुक्त आहेत याची माहिती सौ.दीपिका सामंत,सौ.जान्हवी पडते,सौ.यज्ञा साळगांवकर, सौ.सिद्धी चव्हाण ,सौ.श्वेता माधव यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली .
या रानभाज्यांमध्ये सुरणाचा पाला, भारंगी, घोट्याची वेल, नरवेल,शेवग्याचा पाला,एक पान,कुरडू,फागला,अळू,टाकळा,सुरण,भोपळयाच्या वेलची, फुलांची भाजी अशा नानाविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता.
आजकालच्या मुलांचा कल हा चमचमीत व आकर्षक फास्टफूड खाण्याकडे असतो.पण रानभाज्यांपासूनही आकर्षक ,रूचकर पदार्थ बनवता येतात.. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आजचे रानभाजी प्रदर्शन .यामध्ये कारल्याचे स्टार्टर ,अळूचे फदफदे ,फागलाचे भरीत, अळूच्या गाठी ,अळूच्या पानांची भजी,कुर्डूची, शेवग्याच्या पाल्याची भाजी, सुरणाची कापे, अळुपानांची रुचकर पोटली, शेवगा कटलेट,बीटरूट मोदक,मशरूमचे पराठे अशा विविध पाककृतींचे प्रदर्शन यावेळी पहावयास मिळाले. वर्षभरात असे राष्ट्रीय हरीत सेने मार्फत विविध उपक्रम आयोजित केले जातात
या कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, खजिनदार दत्ता साळगांवकर ,संचालक राजेश सामंत ,प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर,सयाजी बोंदर, विनायक कांबळे उपस्थित होते. सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या रानभाजी महोत्सवाचे त्याचबरोबर पाककृतींचे कौतुक करून मुलांना रानभाज्यांच्या सेवनाचे महत्त्व पटवून दिले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.