दिलदार मनाचा धाडसी लोकप्रतिनिधी म्हणजे पुष्पसेन सावंत – प्रा.अरुण मर्गज

पुष्पसेन सावंत यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत त्यांना आदरांजली
प्रतिनिधी । कुडाळ : दिलदार मनाचा, धाडसी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राजकारणाकडे पाहणारा जन मनातील लोकप्रतिनिधी म्हणजे माजी आमदार पुष्पसेन सावंत होय. असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी काढले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये अगदी ट्रक ड्रायव्हर पासून ते आमदार म्हणून काम करत असतानाच्या त्यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला. उमेश गाळवणकर व त्यांची बॅ नाथ पै शिक्षण संस्था ज्या थोर समाजवादी विचारांच्या व्यक्तींच्या विचारावर श्रद्धा ठेवून वाटचाल करत आहे; त्यापैकी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे आधारवड म्हणून पुष्पसेन सावंत यांचे असलेले योगदान त्यांनी उपस्थितांसमोर कथन केले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रा नितीन बांबर्डेकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उपस्थितांसमोर कथन केले. सामाजिक सुखदुःखामध्ये सहभागी होऊन जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग उपस्थिततांसमोर कथन केले त्यांच्या शेतकरी बाणा असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे व शैक्षणिक योगदानाचे सुद्धा उपस्थितांसमोर कथन करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या उपप्रचार्या विभा वझे, मधुरा इंन्सुलकर,बी.एड महाविद्यालयाच्या प्रा.योगिता शिरसाट, प्रा.मेघा पवार, नर्सिंग कॉलेजच्या प्रा.वैशाली ओटवणेकर, प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रसाद कानडे व विविध विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.