कणकवली ठाकरे गट महिला आघाडी कडून पोलिसांना रक्षाबंधन

गेली अनेक वर्ष ठाकरे गट महिला आघाडी कडून जपली जात आहे सामाजिक बांधिलकी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी कडून आज कणकवली पोलीस स्टेशन मध्ये पोलीसां सोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. जनतेच्या व महिला भगिनींच्या सुरक्षे करिता अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून शिवसेना महिला आघाडी गेले अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावेळी जिल्हा संघटक मधुरा श्रीराम पालव, वैदेही गुडेकर तालुका संघटक, संजना कोलते उप तालुका संघटक, दिव्या साळगावकर उपशहर संघटक, माधवी दळवी, मनुश्री दळवी आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी