बोर्डवे आश्रम शाळेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे

विद्यार्थ्यांना खाऊसह भेटवस्तू दिल्या भेट
कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील आश्रम शाळेत जात आज रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध स्तरात काम करणाऱ्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, व्यापारी गौरव गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश महाडिक, तेजस परब, बाळकृष्ण वलशिवडे यांनी आश्रम शाळेत भेट देऊन रक्षाबंधन दिन साजरा केला.
यावेळी गौरव गवाणकर यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृति प्रित्यर्थ व सिद्धेश महाडिक यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू भेट म्हणून दिल्या.
यावेळी आश्रम शाळा कडून श्री. कर्पे सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कणकवली प्रतिनिधी