भिरवंडेकर मराठा समाज अध्यक्षपदी यशवंत सावंत यांची बिनविरोध निवड

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या भिरवंडेकर मराठा समाज मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी
भिरवंडे जाभुळभाटलेवाडी येथील यशवंत वामन सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरात भिरवंडेकर मराठा समाज, मुंबईची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी पुढील ५ वर्षासाठी २०२३ ते
२०२८ कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड झाली. मंडळाचे अध्यक्ष अजित सावंत, सरचिटणीस मोहन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला जेष्ठ कार्यकर्ते अशोक देवजी सावंत, एम.एन. सावंत आदी उपस्थित होते. मंडळाची नविन कार्यकारिणी अशी ः- यशवंत वामन सावंत – अध्यक्ष, मोहन सखाराम सावंत – उपाध्यक्ष,अनिल बाळकृष्ण सावंत – सरचिटणीस,विलास भास्कर सावंत – खजिनदारपदी निवड झाली. मंडळाच्या सदस्यपदी -आशिश मारूती सावंत,गणेश जगन्नाथ सावंत,प्रदिप केशव सावंत,दिपाली विलास सावंत,शिवाजी जगन्नाथ सावंत,सतिश शंकर सावंत,मंगेश वसंत सावंत,राजश्री रविंद्र सावंत,अजित परशुराम सावंत,राजेंद्र नारायण सावंत,मुकुंद परशुराम सावंत,स्वेता प्रदिप सावंत,रणजित रघुनाथ सावंत,प्रकाश वसंत सावंत,नागेश मारुती सावंत,शुभांगी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी