दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये कोकण आयुक्त सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर!

सुट्टी दिवशी कोकण आयुक्तांच्या जिल्हा दौऱ्याची दबक्या आवाजात चर्चा

जिल्ह्यातील जि.प. अंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत असणारी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असणारी ग्रामपंचायत, पंचायत समिती व अन्य कार्यालय सुरू ठेवण्यात आली आहेत. 6 ऑगस्ट रोजी श्री. कल्याणकर हे जिल्हा परिषद ला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५ व ६ ऑगस्ट रोजी सर्व कार्यालय सुरू ठेवण्या सोबत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात याव्यात व कुणीही मुख्यालय सोडू नये असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. मात्र कोकण आयुक्त श्री. कल्याणकर यांचा दौरा हा नियमित कामकाजा ऐवजी सुट्टी दिवशी आयोजित करण्या मागे नेमकी कारणे काय? अशी चर्चा आता कर्मचारी, अधिकारी वर्गामध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!