तरेळे परिसरातील बीएसएनएलची सेवा न सुधारल्यास आंदोलन छेडणार

सामाजिक कार्यकर्ते संजय नकाशे यांचा इशारा

तळेरे दशक्रोशीसाठी असणारा तळेरे येथील बीएसएनएल कंपनीचा टाॅवर गेले वर्षभर नादुरुस्त व बंद आहे.यामुळे परीसरातील बीएसएनएल ग्राहक रेंज नसल्याने हैराण झाले असून वरिष्ठ कार्यालयाकडून देखभाल दुरूस्तीकडे दूर्लक्ष होत असल्याने ही अवस्था गेली वर्षभर होत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते संजय नकाशे यानी पुढिल आठ दिवसांत बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास टाॅवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तळेरे दशक्रोशीतील बहुतांश बीएसएनएल सेवा गेली वर्षभर विस्कळित झाली आहे. यामुळे वारंवार टाॅवर मधील बिघाडामुळे होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत स्थानिक बीएसएनएल अधिकारी याच्याशी दूरध्वनीवरून सामाजिक कार्यकर्ते संजय नकाशे यानी माहिती घेतली असता लाईट नसल्यानंतर बॅटरी बॅकअप नसल्याने अचानक रेंज नसल्याचे कारण पुढे आहे.
याबाबत संजय नकाशे यानी वरीष्ठ कार्यालयातील अधिकारी फोन उचलत नसल्याचे सांगत अशा कारभारामुळे बीएसएनएलची सेवा उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहक बीएसएनएल सोडून खाजगी कंपनीला पसंती देत आहेत. मात्र ग्रामीण भागात बीएसएनएलचे नेटवर्क चांगले असल्याने अशा अधिकाराच्या गलथान कारभारामुळे सेवा विस्कळित होत असल्याने आपण आंदोलन छेडण्यात येईल असे श्री. नकाशे यानी सांगितले

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!