कणकवली विधानसभेत युवा सेनेची मोर्चे बांधणी
युवा सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांकडून कणकवली मतदारसंघाचा आढावा
लवकरात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी आज कणकवली विजय भवन येथे कणकवली विधानसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण पाटकर व युवासेना कार्यकारिणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व आढावा घेतला. हा काळ सर्व शिवसैनिकांसाठी संघर्षाचा आहे मात्र येणार काळ हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा असले असा आत्मविश्वास पाटकर यांनी बोलताना व्यक्त केला.
युवासेनेचा राज्यात मोठा विस्तार होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युवासेना संघटना अजून बळकट व्हावी यासाठी सिंधुदुर्गच्या व खासकरून कणकवली विधानसभेच्या बांधणीसाठी आम्ही स्वतः लक्ष देणार आहोत सर्व पदांवर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. जनतेचे काही प्रश्न असतील तर ते सोडविण्यासाठी युवासैनिकांनी तत्पर रहावे. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यावर भर द्यावा. युवासेनेच्या उत्तम कामगिरी करणाऱ्यांना भविष्यात मोठी संधी आहे.आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक पदाधिकाऱ्याने करावा असे प्रवीण पाटकर व सुप्रदाताई फातर्पेकर यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली विधानसभा मतदार संघातील युवासेना संघटनेची माहिती दिली ते म्हणाले ज्या दिवशी पासून आपल्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघात युवासेना संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने युवासेनेची उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख ते शाखाप्रमुख पर्यंत जवळपास ७० टक्के पदांवर पदाधिकारी नेमून ते कार्यरत आहेत. उर्वरित ३० टक्के संघटना बांधनीचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. येणाऱ्या निवडणुकीत कणकवली विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार व त्यात सिंहाचा वाटा हा युवासेनेचा असेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवासेनेच्या माध्यामातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला जात आहे. रक्तदरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रश्नांवर आवाज उठवत आहोत.वरिष्ठांनी देखील या प्रश्नांकडे लक्ष देऊन राज्य पातळीवरून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत जिल्हयातील युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली.
सुप्रदा फातर्पेकर यांनीही युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मागणी केल्या नुसार आदित्य साहेबांसोबत बैठक लावण्याची जबाबदारी ही माझी राहील व लवकरच ही बैठक लावली जाईल अशी ग्वाही दिली. येत्या काळात आम्ही येत राहू व युवासेनेला जे काही योगदान लागेल ते आम्ही करू असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी युवासेना विभागीय सचिव मंदार शिरसाट, सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर ,सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची राऊत, सिनेट सदस्य मिलींद साटम, सिनेट सदस्य धनराज कोचडकर, उपसचिव रेणुका विचारे, विस्तार अधिकारी मिता कदम, विस्तारक श्रद्धा धाग, विभाग अधिकारी मुंबई पायल ठाकूर व जिल्हा समन्वयक राजू राठोड, जिल्हा समन्वयक गीतेश कडू, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे,उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, अतुल सरवटे, स्वप्नील धुरी, उत्तम लोके, फरीद काझी, गणेश गावकर, नितेश भोगले, तेजस राणे, सचिन आचरेकर, रिमेश चव्हाण, रोहित राणे, संतोष सावंत आदींसह कणकवली विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी