शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उज्ज्वल यश

विद्यालयाचे दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

प्रतिनिधी । कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस.एल.देसाई विद्यालय पाटचे एकूण दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 12 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)साठी एकूण 14 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ०९ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. नऊही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले.
कुमार यश प्रशांत चव्हाण याने 300 पैकी 218 गुण मिळवून जिल्ह्यातील निवड यादीत आठवा क्रमांक पटकावला आहे. त्याला राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने 300 पैकी 216गुण मिळवून जिल्ह्यातील निवड यादीत दहावा क्रमांक पटकावला आहे .हिलाही राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

कुमार मांजरेकर यश वैभव 206 गुण 68.66%
कुमार काळे वैष्णव तानाजी 192 गुण 64%
कुमारी पाटकर धनश्री शशिकांत 180 गुण 60 टक्के
कुमार मेस्त्री प्रज्योत विजय 180 गुण 60 टक्के
कुमार गोसावी तन्मय तुकाराम 174 गुण 58 टक्के
कुमार निर्गुण जयेश उत्तम 172 गुण 57.33 टक्के
कुमार कुडव जयवंत सुधीर 170 गुण 56.66 टक्के .

या सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
उच्च पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 11विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थी पात्र ठरले .कुमार परब आर्यन अनिल याला 300पैकी 210 गुण मिळाले असून त्याला ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
पूर्व माध्यमिक साठी श्री.मारुती सांगळे श्री. विनायक कांबळे, श्री. प्रशांत जाधव ,सौ.दीपिका सामंत,सौ.जान्हवी पडते,सौ.नंदिनी बुरूड,सौ.प्रगती निवतकर,पूर्व उच्च प्राथमिक साठी श्री. गुरुनाथ केरकर ,श्री. रमेश ठाकूर,श्री. सद्गुरु साटेलकर,सौ.अंकिता मोडक, श्री. प्रशांत चव्हाण,श्री.एकनाथ जाधव,सौ.सिद्धी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
संस्था उपाध्यक्ष श्री.दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री.समाधान परब, संस्था सचिव श्री. सुधीर ठाकूर, संस्था सदस्य श्री.देवदत्त साळगांवकर ,श्री.दशरथ नार्वेकर, श्री. नारायण तळावडेकर,श्री.राजेश सामंत,श्री. सुभाष चौधरी ,श्री.अवधुत रेगे,श्री .संजय ठाकूर ,श्री. दीपक पाटकर त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शामराव कोरे,पर्यवेक्षक श्री.राजन हंजनकर यांनी विद्यार्थी,पालक व सर्व मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांचे कौतुक केले.पंचक्रोशीतही या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!