भाजी व मासे विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्गमध्ये छत्री वाटप
प्रतिनिधी l दोडामार्ग
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग बाजारपेठ, झरेबांबर तिठा व साटेली भेडशी येथील भाजी विक्रेते व मासे विक्रेते यांना तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपजिल्हाप्रमुख तुकाराम बर्डे उपतालुकाप्रमुख दादा देसाई व तिलकांचन गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, नंदु गावकर, लाडु आयनोडकर, राधिका गडेकर आदी उपस्थित होते.