वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी रामेश्वर वाचनालयातर्फे सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद–भाग्यश्री कुलसंगे
आचरा–अर्जुन बापर्डेकर
आजच्या इलेक्ट्रॉनिक्स युगात वाचनालये लोप पावत चालली आहेत.मात्र आचरे गावच्या रामेश्वर वाचनालयातर्फे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत बँक ऑफ इंडिया शाखाधिकारी भाग्यश्री कुलसंगे यांनी आचरा येथे व्यक्त केले.
रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित कृषीविषयक ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह उर्मिला सांबारी,अशोक कांबळी, दिपाली कावले ,जयप्रकाश परुळेकर,दिगंबर मुंबरकर, ग्रंथपाल विनिता कांबळी, डॉक्टर प्रमोद कोळंबकर,सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, श्रद्धा महाजनी, कामिनी ढेकणे, विलास आचरेकर,रुपेश साटम यासह वाचनालय कर्मचारी वर्ग वाचक आदी उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्यानंतर पारवाडी येथे वाचनालय कार्यकारिणी सदस्य भिकाजी कदम ,तसेच रुपेश साटम यांच्या परसात आंबा कलम,नारळ यांच्या रोपांची लागवड कुलसंगे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, यांसह बँक ऑफ इंडिया चे अनिकेत घाडी, रुपेश बागवे यांचे विशेष सहकार्य लाभले.