चिंदर सेवा संघाचा पर्यावरण प्रेमी पुरस्काराने सन्मान……!

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्गने कार्याची घेतली दखल

प्रतिनिधी-आचरा–
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्यावतीने कृषी मार्गदर्शन शिबीर, रक्तदान शिबिर या कार्याची दखल घेत, चिंदर येथील “चिंदर सेवा संघाला”, ‘पर्यावरण प्रेमी सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्री, सचिव सिध्देश गोलतकर, खजिनदार गणेश गोगटे, उपाध्यक्ष विवेक परब यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. यावेळी सिध्देश गोलतकर यांनी संघाच्या कार्याची व भावी उपक्रमाची माहिती दिली. तसेच या पुरस्काराचे श्रेय चिंदर सेवा संघाचे माजी अध्यक्ष संदिपभाई पारकर यांचे व संघातील सहकार्याचे असून हा पुरस्कार आम्ही संदिपभाई पारकर यांना समर्पित करतो. असे सांगितले.
कुडाळ येथील मराठा हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात चिंदर सेवा संघाला सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देवून मान्यवर पंचम खेमराज विद्यालयाचे निवृत्त शिक्षक सुभाष गोवेकर व पास्कल राँड्रीग्ज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चिंदर सेवा संघ गेली पाच वर्षे रक्तदान शिबिर, कृषीमार्गदर्शन, भगवंतगड किल्ल्यावर शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा असे उपक्रम घेत आहे. या कार्यांची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांनी त्यांना सन्मानित केले आहे.
यावेळी व्यासपीठावर श्री. संदेश किंजवडेकर, कुडाळ तालुका गट शिक्षणा अधिकारी, श्री.विनायक परब, सिंधुदुर्ग जिल्हा-परब मराठा समाज,
श्री. डॉ. बापू अशोक भोगटे – पर्यावरण प्रेमी, श्री. रामचंद्र परब-संघटक – परब मराठा समाज कोकण विभाग अध्यक्ष बापू परब, जोईल डीस्लील्वा, सुभाष गोवेकर-निवृत्त शिक्षक पंचमखेमराज
आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, रक्तदान विषयक कार्ये करणाऱ्या संस्थाना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू परब यांनी तर आभार श्री गावडे यांनी मानले.

error: Content is protected !!