आजगाव ग्रामपंचायत आयोजित “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व उद्योजक परिचय प्रशिक्षण

आजगाव (प्रतिनिधी)

दि १ जुलै २०२३ रोजी ग्राम पंचायत आजगाव आयोजित “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व उद्योजक परिचय प्रशिक्षण “आजगाव वाचनालय हॉल येथे जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,सिंधुदुर्ग च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले .या वेळी आजगाव ,धाकोरा ,नानोस ,मळेवाड गावचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,उमेद अभियान चे पदाधिकारी ,एकता प्रभाग संघ प्रमुख ,मैत्री ग्रामसंघ अध्यक्ष ,सदस्य ,बचत गट महिला ,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
या वेळी प्रकल्प अधिकारी श्री गावडे साहेब ,उद्योग केंद्र व्यवस्थापक श्री पाटील साहेब आणि प्रकल्प अधिकारी श्री पाडवे साहेब यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले ..मुख्यमंत्री उद्योग निर्मिती योजनेचे फॉर्म ,माहिती पत्रक तसेच विविध रोजगार प्रशिक्षण चे फॉर्म उपस्थिताना वितरित करण्यात आले

error: Content is protected !!