कुंभवडे हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्री शामसुंदर खरात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त.
शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने “आप्पासाहेब पटवर्धन शिक्षकेतर” पुरस्काराने केले सन्मानित.
सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थाचालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी व हितचिंतक झाले भावुक.
कणकवली/मयुर ठाकूर.
कुंभवडे हायस्कूल मध्ये गेली 29 वर्ष शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले भडगाव गावचे सुपुत्र श्री श्यामसुंदर खरात हे नियत वयोमानानुसार 1 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले.नुकताच श्री शामसुंदर खरात यांचा प्रशालेत सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न झाला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्यामसुंदर खरात हे अत्यंत मनमिळावू,प्रेमळ आणि नम्र स्वभावाचे असल्या कारणाने गावातील ग्रामस्थ्यांना ते आपलेसे वाटतं आणि म्हणूनच सत्कारसोहळ्याप्रसंगी गावाकऱ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्यामसुंदर खरात हे संततपरंपरेतील वारकरी आहेत,त्यांना भजन-कीर्तन या वारकरी संप्रदायाची मोठी आवड असल्याकारणाने शालेय कामकाजाबरोबर गावातील विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये देखील ते उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचे.प्रशालेमध्ये सर्व विध्यार्थी आणि पालकांचे आवडते काका, खरात काका अशी त्यांची ओळख होती.सत्कारसोहळ्याप्रसंगी अनेक विद्यमान आणि माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत खरात काका सेवानिवृत्त होतायत याबद्दल हळहळ व्यक्त केली.गावचे सरपंच,गावकरी तसेच खरात काकांचे हितचिंतक यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्यामसुंदर खरात यांचं शालेय कामकाजबरोबर सामाजिक,धार्मिक कार्य मोठं असल्याकरणामुळे त्यांचा शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने “आप्पासाहेब पटवर्धन शिक्षकेतर पुरस्कारा” देऊन त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार शिक्षक भारती कणकवली तालुका अध्यक्ष प्रसाद मसुरकर, कनेडी प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, उपमुख्याध्यापक बयाजी बुरान यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने देखील श्री खरात यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशाला हेच माझं कुटुंब आणि शाळा हेच घर असं समजून 29 वर्षे अखंडित सेवा केल्याबद्दल शालेय समिती सदस्य श्री मोहनराव सावंत यांनी खरात यांचे कौतुन केले.श्यामासुंदर खरात यांच्यासारखा प्रामाणिक,निष्ठावंत कर्मचारी प्रशालेला मिळण ही देखील भाग्याची बाबा अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांच्या सेवेकरीता रात्रीचा दिवस करून प्रशालेच्या यशस्वी वाटचालीकरिता आपल्या कारकिर्दीत भरीव असं सहकार्य प्रशालेला दिल आणि त्यासाठी त्यांच्या पत्नी सौ शोभा श्यामसुंदर खरात देखील त्यांच्या सोबत राहिल्या,यापुढे देखील आपल्या अनुभवाची गरज प्रशालेला आहॆ अश्या शब्दात शालेय समिती अध्यक्ष ऍड राजेंद्र रावराणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या 29 वर्षाच्या कार्यकाळात श्री खरात यांना चार मुख्याध्यापक लाभले. त्यामध्ये श्री कारेकर सर,श्री हनुमंत दळवी सर,श्री शिंत्रे सर आणि विद्यमान मुख्याध्यापक अपूर्वा सावंत या सर्वांनी श्यामसुंदर खरात यांना चांगल्या प्रकारे साथ दिली. प्रेम,माया,लोभ दिळा.काकांच्या पाठीशी संपूर्ण स्टाफ हा कायम प्रत्येक संकटात उभा राहिला.संस्था पदाधिकारी श्री संतोष तावडे साहेब आणि कै. शंकर महादेव सावंत यांच्या आशीर्वादाने आणि महालिंगेश्वराच्या कृपेने ही 29 वर्ष कशी गेली हे देखील त्यांना कळाले नाही.गावाने देखील भरभरून प्रेम दिल.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी यांनी अतोनात प्रेम करत खरात काका यांना सांभाळून घेतले याबद्दल सत्कारमूर्ती श्री शामसुंदर खरात यांच्या वतीने पत्रकार मयुर ठाकूर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.या सत्कार सोहळ्याप्रसंगी कुंभवडे प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष ऍड राजेंद्र रावराणे.शालेय समिती सदस्य मोहनराव सावंत,गावचे प्रथम नागरिक सौ कानडे,माजी सरपंच श्री तावडे,माजी मुख्याध्यापक शिंत्रे सर,विद्यमान मुख्याध्यापक अपूर्वा सावंत,पत्नी सौ शोभा खरात, मुलगा सुमंत खरात,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी,विविध संघटनांचे कर्मचारी,तसेच श्यामसुंदर खरात यांचे सर्व हितचिंतक,गावकरी उपस्थित होते.