ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेचा गुरुपौर्णिमा सोमवारी महोत्सव
शिवोली (गोवा), प्रतिनिधी
ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार, ३ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता. ओशेल बामणवाडा, शिवोली – गोवा येथे
हा महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी सकाळी १० वाजता भक्तीगीत भजने, स. ११ वाजता प. पूज्य श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजींचे आगमन, स.११ ते दुपारी १.३० शिष्यांचे सद्गगुरुंबद्दल मनोगत आणि प्रसाद वाटप होईल. तसेच या महोत्सवास बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे.