वंदे भारत एक्स्प्रेसला जिल्ह्यात आणखी थांबा द्यावा

दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री
सावंतवाडी
कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सिंधुदुर्ग व रायगड मध्ये थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या गाडीला सिंधुदुर्गात कणकवली येथे एकच थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर सावंतवाडी व कुडाळ येथील नागरिकांनी आपल्या रेल्वे स्थानकात गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. यात सिंधुदुर्ग आणि रायगड येथे गाडीला थांबा देण्यात यावा, असे म्हटले आहे.
 
	




